जायकवाडी धरणाच्या कालव्यातून पाणी बंद करा, शेतकऱ्यांचा जलसमाधीचा इशारा

Foto

पैठण - जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून जाणारे पाणी बंद  करावे, या मागणीसाठी शेतकर्‍यांनी आज (बुधवार) आंदोलन करीत जलसमाधी घेण्याचा इशारा  दिला, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

 

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी, परळी, जालन्यासाठी कोणतेही नियोजन नसताना दोन महिन्यापेक्षा जास्त दिवसांपासून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील तब्बल 10 टीएमसी पाणी वाया गेले असून कालव्यातील पाणी बंद करण्याची मागणी शेतकर्‍यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती. मात्र या मागणीस विभागाने केराची टोपली दाखविली. आज सकाळी 11 वाजता शेतकरी जलसमाधी घेण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना अडविले. जायकवाडी प्राधिकरणार्‍या अधिकार्‍यांनी दोन दिवसात पाणी बंद करण्याचे आश्‍वासन दिल्याने शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी  पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, सपोनी ज्ञानेश्वर पायघन, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक चव्हाण, नायब तहसीलदार आनंद बोबडे यांच्यासह दंगा काबू नियंत्रण पथक आदींची उपस्थिती होती.